Tuesday, September 29, 2015

वृक्षारोपण

वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील,गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. 

प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जोपासना करण्याचा संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड च्या मुलांनी वृक्षारोपण करून केला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने घराकडून एक रोपटे आणून संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.

झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. या वेळी श्री कोकाटे सर  म्हणाले की, वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचाही सहभाग लाभला 

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीहि सुस्वरे आळविती

येणे सुखे रुचे एकांताचा वास
नाही गुणदोष अंगा येत

आकाश मंडप पृथ्वी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी

कथा कमंडलू परवडी विस्तार
करोनी प्रकार सेवू रुची

तुका म्हणे होय मानसी संवाद
आपुलाची वाद आपणासी



कार्यक्रमाचे अधिक फोटो पाहण्यासाठी फोटोवर  क्लिक करा…